महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुटप्पी; मात्र पवारांच्या मनातील काम मोदींनी केले' - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadanvis at Kisan Atmanirbhar Yatra

रयत क्रांती संघटना आणि भाजपा किसान मोर्चाच्या वतीने कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ 24 डिसेंबर पासून सांगली मधून किसान आत्मनिर्भर यात्रा आयोजित करण्यात आले होती. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री व विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.

Devendra Fadnavis talks about farm laws and Sharad Pawar at Kisan Atmanirbhar Yatra in Sangli
'काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुटप्पी; मात्र पवारांच्या मनातील मोदींनी केले' - देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 28, 2020, 3:42 AM IST

Updated : Dec 28, 2020, 4:37 AM IST

सांगली - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दुटप्पी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पवारांच्या मनातले काम मोदी यांनी केले आहे, मात्र आपली दुकानदारी बंद होणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आता विरोध करत आहेत अशी टीकाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुटप्पी; मात्र पवारांच्या मनातील मोदींनी केले' - देवेंद्र फडणवीस

किसान आत्मनिर्भर यात्रेचा समारोप..

रयत क्रांती संघटना आणि भाजपा किसान मोर्चाच्या वतीने कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ 24 डिसेंबर पासून सांगली मधून किसान आत्मनिर्भर यात्रा आयोजित करण्यात आले होती. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री व विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार-खासदार उपस्थिती होते.

शेतकरी नेते म्हणवणारे कृषी कायद्यांविरोधात..

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणले, कृषी कायद्याला केवळ राजकारणासाठी विरोध करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या टाकून काढण्याचे काम केले, आणि त्याचा जल्लोश करण्यासाठी आम्ही किसान आत्मनिर्भर यात्रा घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. मात्र शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे कृषी कायद्याला विरोध करत आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली.

70 वर्षांनंतर सरकारच्या जोखडातून शेतकरी मुक्त..

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या 70 वर्षे या देशातील शेतकरी जोखडयात होती, बंधने घातली गेली होती, मात्र नरेंद्र मोदी यांनी 70 वर्षांपासून सरकारच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचे काम केले आहे. पण काही घुबडांना दिवसा स्वप्न पडायला लागली आहेत, शेतकरी गुलाम राहिला पाहिजे. पण तसे आता राहिले नाही, तसेच करार शेती कायदा हा 2006 मध्ये आला आहे, त्यात मोदी सरकारने सुधारणा केली.

शेतकरी मताचा अधिकारी रद्द का केला?

मात्र केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांना अदानी-अंबानी शेती काढून घेणार आहेत, अशी भीती घालत आहेत. आदनी-अंबानी येडे नाहीत, ते व्यापारी आहेत, ते कशाला येतील? ते या 6 वर्षात जन्माला आलेले नाहीत. तसेच बाजार समिती बंद झाल्यातर शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची ओरड करत आहेत, पण राज्यात भाजपा सरकारने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतांचा अधिकार दिला होता, तो अधिकार महाविकास आघाडी सरकारने का रद्द केला? असा सवाल खोत यांनी यावेळी उपस्थित केला.

मग महाराष्ट्रातील शेतकरी गप्प का?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कृषी कायद्यांविरोधात एकही शेतकरी उठला नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना उचकवण्याचे काम केले, पण तसे झाले नाही. पंजाब, हरियाणा सोडून इतर का शेतकरी आंदोलन करत नाहीत? महाराष्ट्रात सत्ता आहे, मग शेतकऱ्यांचे आंदोलन इथे का नाही? त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आम्ही विनंती करणार आहे, केवळ मूठभर लोकांसाठी कायद्या बदलू नका.

कृषी कायद्या बाबत दुटप्पी भूमिका..

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृषी कायद्या बाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने आधी समर्थन केले होते, व तिन्ही कृषी कायदे कसे चांगले आहेत हे सांगण्यासाठी कृषी विभागाला पत्र पाठवून शेतकऱ्यांना प्रबोधन करण्याचे आदेश दिले होते. मात्र मोदी सरकारने शेतकरी बाजूचे घेतलेले निर्णय किती महत्वाचे आहेत, आणि राजकारण सुरू झाले. हे महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचले, तर आपली राजकीय दुकाने बंद होतील या राजकीय हेतूने पाठवलेली पत्रं परत घेतली, त्यामुळे या कायद्याबाबत सरकारची भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने हमीभाव कायदा रद्द केला..

3 वर्षांपूर्वी आम्ही हमीभाव कायदा आणला होता, ज्यामध्ये शेतकऱ्याचा माल हमीभावापेक्षा कमी किंमतीत विकत घेतल्यास 1 वर्षाचा कारावास असा कायदा केला होता. मात्र विधान परिषदेत तो कायदा का मंजूर केला नाही? का त्याला विरोध केला, आणि विधानपरिषदमध्ये आमचे बहुमत नसल्याने अडवण्याचे काम केले. तेच आता आता हमीभाव द्या अशी मागणी करत आहेत. असे दुटप्पी काम सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

पवारांचे मनातले मोदींनी केले..

शरद पवार हे द्रष्टेनेते आहेत, शेतीतलं शरद पवारांना कळते, आणी त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये बाजार समितीबाबत आक्षेप नोंदवला आहे. तसेच, शरद पवारांना शेतकऱ्यांबाबतीत जे अपेक्षित होते, ते काम नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याला विरोध करत आहे. शेतकरी मुक्त करणारी व्यवस्था नरेंद्र मोदी यांनी तयार केली आहे. आज मुंबई मध्ये शेतकरी थेट बाजार येऊन आपला माल विकतो, त्याला अडत, तोलाई आणि हमाली द्यावी लागतात. आतापर्यंत व्यापारी हा बाजाराचा मालक होता, पण आता शेतकरी हा बाजाराचा मालक आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

Last Updated : Dec 28, 2020, 4:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details