सांगली: काही लोक माथी भडकवून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थासाठी राज्यात धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत ही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पहाटेच्या शपथविधी वरून होणाऱ्याला टीकेला उत्तर देताना, म्हणाले सकाळी 8 म्हणजे पतुमची पहाट असेल, तर धन्यचं अशा शब्दात विरोधकांना ( Ajit Pawar Statement ) फटकारले. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजकीय स्वार्थासाठी धार्मिक मुद्दे -
यावेळी अजित पवार म्हणाले, जे काय सध्या महाराष्ट्रात चाललय ते पटत नाही. आज खऱ्या अर्थाने प्रश्न आहे, तो महागाईचा. पण काही लोक माथी भडकवायच काम करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.हे चुकीचं आहे. मुख्यमंत्री सुद्धा आजपर्यंत शांत होते. पण काही लोक राजकीय स्वार्थासाठी भोंगे, हनुमान चालीसा असे धार्मिक मुद्दे करत आहेत. पण काही व्यक्ती विकृतपणे बोलत असतील, तर विनाश काली विपरीत बुद्धी असे एका वाक्यात म्हणावे लागेल. संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे, म्हणून काही ही बोलावे हे योग्य नाही. त्यामुळे राज्यातील वातावरण खराब होणार असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शरद पवारांचे 60 वर्षाची कारकीर्द ( Sharad Pawar 60 year career ) आहे, पण त्यांनी कधी कमरेच्या खालची टीका, आरोप कोणावर केला नाही.