महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून बोट सज्जतेची प्रात्यक्षिके.. - मॉकड्रील सांगली

संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये बोटींच्या सज्जतेचे प्रात्यक्षिके पार पडली. गाव पातळीवर ही याच पद्धतीने प्रशासनाकडून तयारी सुरू असून पूरस्थितीतील स्थलांतराच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निवारा केंद्रांचा शोध घेण्यात आल्याची माहितीही यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली.

flood boat mockdrell
flood boat mockdrell

By

Published : May 24, 2021, 8:13 PM IST

Updated : May 24, 2021, 8:23 PM IST

सांगली - संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये बोटींच्या सज्जतेचे प्रात्यक्षिके पार पडली. गाव पातळीवर ही याच पद्धतीने प्रशासनाकडून तयारी सुरू असून पूरस्थितीतील स्थलांतराच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निवारा केंद्रांचा शोध घेण्यात आल्याची माहितीही यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली.

बोट सज्जतेची घेण्यात आली प्रात्यक्षिके -

गेल्या काही वर्षांपासून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दरवर्षी खबरदारी घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळींवर तयारी केली जाते. संभाव्य पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाकडून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी सामना करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शासनाच्या आपत्ती यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्याकडे असणाऱ्या बोटींची चाचणी घेण्यात आली आहे. सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मिरजेचे प्रांत अधिकारी समीर शिंगटे, अप्पर तहसीलदार अर्चना पाटील व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बोटींच्या सज्जतेची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी स्वतः बोटींमध्ये बसून यावेळी बोटींची चाचणी घेतली.

सांगलीत बोट सज्जतेची प्रात्यक्षिके
स्थलांतरासाठी निवारा केंद्रही सज्ज -
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे म्हणाले, संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी बचावकार्यासाठी बोटी महत्त्वाच्या ठरतात, त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. यामध्ये किंवा अन्य आपत्तीच्या बाबतीत काही त्रुटी असल्यास त्यामध्ये 31 मे पर्यंत सुधारणा करण्यात येणार आहेत. त्याशिवाय सध्या कोरोना परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पुराचे संकट आल्यास स्थलांतराच्या दृष्टीनेही प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे. सोशल डिस्टन्स पाळण्याच्या दृष्टीने मोठ्या निवारा केंद्रांचा शोध घेण्यात आला आहे. गाव पातळीवरही नियोजन करण्यात येत आल्याचेही यावेळी प्रांताधिकारी शिंगटे यांनी स्पष्ट केले.
Last Updated : May 24, 2021, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details