सांगली -कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथे एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता मुंबईवरून आलेली ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह अंत्यसंस्कारात सहभादी झालेल्या २८ जणांना ताब्यात घेऊन इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नियंत्रणात आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अंत्यसंस्कारानंतर कळले..'तो' होता पॉझिटिव्ह; सांगलीतील धक्कादायक प्रकार! - covid-19 in sangli
कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथे एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता मुंबईवरून आलेली ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह अंत्यसंस्कारात सहभादी झालेल्या २८ जणांना ताब्यात घेऊन इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील एक व्यक्ती मुंबईतील सायन परिसरात रिक्षाचालक आहे. संबंधित व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी मुंबईत मृत्यू झाला. यानंतर १९ एप्रिलला त्यांच्यावर कडेगावच्या खेराडे वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मात्र, या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा आहवाल आला; आणि खळबळ उडाली.
संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मुंबई महापालिकेतर्फे २२ एप्रिलला जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाली करून या व्यक्तीशी संबंधित २८ जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. या सर्वांचे स्वॅब घेण्यासाठी आरोग्य पथक कडेगावला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
या घटनेनंतर खेराड वांगी गावात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. संबंधित कोरोना बाधित व्यक्तीला १७ एप्रिलला हृदयरोगाचा त्रास झाल्याने सायनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर १९ एप्रिलला त्यांच्या मूळगावी खेराड वांगी येथे अंत्यसंस्कार पार पडले. खबरदारीसाठी सायन रुग्णालयात त्यांची टेस्ट घेण्यात आली होती. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर खेराड वांगी हे गाव १०० टक्के लॉकडाऊन करून ३ किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.