महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : प्रकाश हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, स्टाफवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी - Prakash Hospital doctors offenses news

प्रकाश हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, सहकारी स्टाफ यांच्यावरील गुन्हे प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत पाटील यांनी केली आहे. तसेच, मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा पाटील यांनी दिला आहे.

Prakash Hospital doctors offenses withdrawal demand
प्रकाश रुग्णालय कर्मचारी गुन्हे

By

Published : May 29, 2021, 10:29 PM IST

सांगली -प्रकाश हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, सहकारी स्टाफ यांच्यावरील गुन्हे प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत पाटील यांनी केली आहे. तसेच, मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा पाटील यांनी दिला आहे.

माहिती देताना कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील

हेही वाचा -'मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने संसदेमध्ये भूमिका घ्यावी'

सांगली इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमधील डॉक्टरवर कोविड रुग्णांकडून जादा बील आकारणी केल्या प्रकरणी चार दिवसांपूर्वी इस्लामपूर पोलिसांत अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे येथील डॉक्टर व सर्व कामगारांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले होते. मात्र, रुग्णांची गैरसोय होत असल्याने आजपासून रुग्णांची जबाबदारी घेत काळ्या फिती लावून हे आंदोलन सुरू ठेवणार आहे. दोन दिवसांत या प्रकरणाची रास्त चौकशी करून गुन्हे मागे घेण्याचा आदेश द्या, अन्यथा हे आंदोलन पुढे तीव्र करणार असल्याचे कामगार युनियन अध्यक्ष डॉ. अभिजित पाटील यांनी इशारा दिला. यावेळी रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हॉस्पिटल विरोधात सातत्याने रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल करून अट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दुर्दैवी व खेदजनक आहे. डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ व इतर सहकारी यांच्यावरील गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करणार असल्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला होता, मात्र कोरोना काळात असा निर्णय घेऊ नये, असे हॉस्पिटल प्रशासन व्यवस्थापनाने सर्व डॉक्टर्स व सहकारी यांच्यासह झालेल्या चर्चेतून सांगितले. तथापि, हॉस्पिटल प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आजचे काम बंद आंदोलन स्थगित करून प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम सुरू करीत असल्याचे डॉ. अभिजीत पाटील यानी सांगितले.

हेही वाचा -धनगर समाजाने एकत्र येऊन आरक्षणासाठी लढा उभारावा - डांगे

ABOUT THE AUTHOR

...view details