सांगली: विहिरीमध्ये बुडून आजोबा आणि चिमुकल्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यातल्या रेवनाळ येथे घडली आहे. (Death by drowning in sangli). रानात शेळ्या राखण्यासाठी गेलेले असताना 3 वर्षीय मुलगा विहिरीमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी आजोबांनी विहिरीमध्ये उडी मारली, मात्र त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. (child and grandfather died by drowning). या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Death by drowning: विहिरीत बुडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू, नातवास वाचवताना घडली घटना - Death of child and his grandfather by drowning
विहिरीमध्ये बुडून आजोबा आणि चिमुकल्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यातल्या रेवनाळ येथे घडली आहे. (Death by drowning in sangli). बुडणाऱ्या नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी विहिरीमध्ये उडी मारली, मात्र त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. (child and grandfather died by drowning).

नातवाला वाचवताना गेला आजोबाचा जीव: आबासाहेब कडाप्पा कुलाळ, वय 70 व त्यांचा नातू कार्तिक गुरुदेव कुलाळ, वय 3 हे दोघेजण घरापासून काही अंतरावर शेळया चरण्यासाठी गेले होते. शेळ्या राखत असताना त्यांचा नातू कार्तिक हा एका विहिरीजवळ गेला, यावेळी विहिरी जवळून जात असताना कार्तिकचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. ही बाब आजोबा आबासाहेब कुलाळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर नातू कार्तिक याला वाचवण्यासाठी त्यांनी थेट विहिरीमध्ये उडी घेतली. मात्र घाबरलेल्या नातू कार्तिकेने आजोबांना मिठी मारली, त्यामुळे आजोबा आणि नातू दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेच्या वेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कोणाला पोहचता आले नाही.
पाणबुडी बोलावून काढण्यात आले मृतदेह: दरम्यान, ही घटना गावकऱ्यांना समजताच या दोघांचेही मृतदेह काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. विहीर 40 फूट खोल व काठोकाठ भरलेली असल्याने मृतदेह शोधण्यात अडथळे येत होते. सायंकाळी अजनाले ता.सांगोला येथून पाणबुडी टीम बोलावून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची रात्री उशिरा पोलिसात नोंद झाली आहे.