सांगली- जिल्हा मध्यवर्ती बँकेने दोन साखर कारखान्यासह पाच मोठ्या संस्थांवर लिलाव कारवाईचा बडगा उगारला आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी या बँकांककडे असल्याने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील श्री महांकाली साखर कारखाना आणि माणगंगा साखर कारखान्यांचा समावेश आहे.
सांगलील 2 कारखान्यांसह पाच संस्थांवर कारवाईचा बडगा; मिळकतीचा जाहीर लिलाव - श्री महांकाली साखर कारखाना
जिल्हा मध्यवर्ती बँकेने दोन साखर कारखान्यासह पाच मोठ्या संस्थांवर लिलाव कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदार संस्थांच्या मिळकती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ताब्यात घेण्यात आल्या होत्या. आता या संस्थांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव सुरू करण्यात आला आहे. याबाबत बँकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा-जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर परदेशी पथक, युरोपियन संघातील सदस्यांचाही समावेश
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील अनेक संस्थांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली आहेत. मात्र, कर्जाची मुदतीत परतफेड केली नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने लिलाव प्रक्रियेचे पाऊल उचलले आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली साखर कारखाना, आटपाडीचा माणगंगा साखर कारखाना, इस्लामपूर येथील शेतकरी विणकरी सूतगिरणी, प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप इंडस्ट्रीज आणि पलूस येथील डिव्हाईन फूड्स इंडिया या थकबाकीदार संस्थांच्या मिळकती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ताब्यात घेण्यात आल्या होत्या. आता या संस्थांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव सुरू करण्यात आला आहे. याबाबत बँकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.