सांगली -जिल्ह्यातील कुरळपमध्ये दसऱ्यादिवशी पोलीस ठाण्यात दसरा साजरा केला जातो. दसऱ्यादिवशी सोने म्हणून आपट्याची पाने लुटण्याची कुरळपमध्ये पन्नास वर्षांची परंपरा आजही कायम आहे.
हेही वाचा - दसरा मेळावा! शिवसेनेसाठी आता सत्ता हिच 'शीव' झाली आहे का?
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप येथे आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा गेली पन्नास वर्षांपासून आजही सुरु आहे. दसऱ्यादिवशी सायंकाळी ६ वाजता हनुमान देवाची पालखी गावातील सर्व देवांची भेट घेऊन पोलीस ठाण्यात आणली जाते. यावेळी पहिले पोलीस पाटील रामराव विठोजी पाटील यांच्या व पोलीस अधिकारी यांच्या हस्ते आपट्याच्या पानांची पूजा करून पोलीस स्टेशनमध्ये जमलेल्या नागरिकांना ही आपट्याची पाने सोने म्हणुन लुटण्याची परंपरी होती.