जत (सांगली) - पांढरेवाडी येथील विजय धोंडीराम म्हानवर यांचे वादळी,वारे अवकाळी पावसाने पोल्ट्री फॉर्म कोसळून २ लाख ७८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये २०० कोंबड्या मृत्यूमुखी झाल्या आहेत.
वादळी वाऱ्यामध्ये पोल्ट्री फॉर्म भुईसपाट
जत (सांगली) - पांढरेवाडी येथील विजय धोंडीराम म्हानवर यांचे वादळी,वारे अवकाळी पावसाने पोल्ट्री फॉर्म कोसळून २ लाख ७८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये २०० कोंबड्या मृत्यूमुखी झाल्या आहेत.
वादळी वाऱ्यामध्ये पोल्ट्री फॉर्म भुईसपाट
पूर्व भागातील पांढरेवाडी येथील म्हानवर वस्तीवर विजय धोंडीराम म्हनवर यांचे घराजवळ पोल्ट्री फॉर्म आहे. चार महिन्यापूर्वी अडीच लाख रुपये खर्च करुन त्यांनी हा फॉर्म उभा केला होता. त्यामध्ये १५०० कोंबड्या होत्या. पूर्ण तयार झालेल्या अडीच किलो वजनाच्या १३०० कोंबड्याची विक्री केली आहे. तर २०० कोंबड्या शिल्लक होत्या. कोंंबड्यासाठी औषधोपचार,खाद्य यावर ४५ हजार रुपये खर्च केला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता अचानक अवकाळी पावसासह सोसायटाचा वारा सुटला. वादळी वा-यामध्ये पोल्ट्री फॉर्म भुईसपाट झाला.पोल्ट्री फॉर्म असलेल्या २०० कोंबड्यावर पत्रा, सिमेंटचे खांब पडले. त्यामुळे कोंंबड्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या.
२ लाख ७८ हजार ६०० रुपयांचे नुकसान
वादळी वाऱ्याने शेड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोल्ट्री फॉर्म शेडचे २ लाख ३८ हजार, कोंंबड्याचे ५० हजार असे एकूण २ लाख ७८ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सचिन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
व्याजाने पैसे घेऊन शेड उभा
विजय म्हानवर यांनी शेत व्यवसायाला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला.चार महिन्यापूर्वी देवस्थानचे ४ टक्के व्याजाने घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. पक्षांची चांगली जोपासना केली होती. भांडवल, केलेल्या खर्च पदरात पडत असताना अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीने क्षणार्धात संपून गेले आहे.
सरकारने मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी
लॉकडाऊनमधून सावरत असतानाच पोल्ट्री फॉर्म शेडचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक संकट कोसळले आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी मदतीच गरज आहे. सरकारने मदत द्यावी, अशी मागणी म्हानवर यांनी केली आहे.