सांगली- महापालिकेवर दलित महासंघाच्यावतीने मोर्चा काढत पाणी फेक आंदोलन करण्यात आले आहे. उपनगर असणाऱ्या शामराव नगर भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघ आणि नागरिकांनी पालिकेच्या दारावर साचलेले पाणी फेकून आंदोलन करण्यात आले.
सांगली महापालिका क्षेत्रातील उपनगर असणाऱ्या शामराव नगर भागात नागरी सुविधांचा मोठा अभाव आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे. सततच्या पावसामुळे शामराव नगरच्या अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचून राहिला आहे. पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही. परिणामी दुर्गंधी पसरून या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. त्यांना या ठिकाणी डेंग्यू-मलेरिया अशा अनेक साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे.
...म्हणून सांगली महापालिकेच्या दारावर पाणी फेकून दलित महासंघाने केले आंदोलन - सांगली ताजी बातमी
शामराव नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे महापालिकेवर दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढत पाणी फेक आंदोलन करण्यात आले.
तर सत्ताधारी भाजपाकडे पाण्याचा निचरा करण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी करण्यात आली. मात्र, पालिकेच्या सत्ताधाऱ्याकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आज संतप्त झालेल्या नागरिकांनी दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी नागरिकांना साचलेले दूषित पाणी महापालिकेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर फेकून सत्ताधारी भाजपाच्या कारभाराचा निषेध केला. दलित महासंघाचे शहराध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पालिका प्रशासनाने येत्या आठ दिवसांत याबाबत योग्य ती पाऊले उचलली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा -कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयातच केली आत्महत्या.. सांगलीतील घटना