सांगली - सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. रुग्णालयाचा कारभार हा उंटावरून शेळी राखण्याचा प्रकार असल्याने थेट उंट आणि शेळी घेऊन रुग्णालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आले आहे.
उंटावरून शेळया राखत दलित महासंघाचा शासकीय रुग्णालयाविरोधात निषेध - Dalit Federation protest
सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. रुग्णालयाचा कारभार हा उंटावरून शेळी राखण्याचा प्रकार असल्याने थेट उंट आणि शेळी घेऊन रुग्णालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आले आहे.
रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात गोरगरिबांसाठी जीवदान देणारे रुग्णालय आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी शाळेच्या शासकीय रुग्णालयात दाखल होतात, या ठिकाणी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा सुविधेच्या दृष्टीने मोठा अभाव आहे. सध्या कोरोनाची साथ आहे, त्या दृष्टीनेही या रुग्णालयाच्या आवारात रुग्णालयांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नाही, इतर वैद्यकीय सुविधाही रुग्णालयात नाही. मात्र याबाबत रुग्णालयाच्या कोणत्याच अधिकाऱ्याला लक्ष द्यायला वेळ नाही आणि रुग्णालयाचा कारभार म्हणजे उंटावरून शेळ्या राखण्याचा सुरू असल्याचा आरोप दलित महासंघाच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी थेट दलित महासंघाच्या वतीने उंट आणि शेळ्या घेऊन शासकीय रुग्णालयवर मोर्चा काढण्यात आला व रुग्णालयाचा कारभार ज्या पद्धतीने सुरू आहे. तो दाखवण्यासाठी उंट आणि शेळी घेऊन रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आल्याचे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी सांगितले.
हेही वाचा -डेल्टा प्लस व्हेरिएंटचा महाराष्ट्रात अधिक धोका.. राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू