सांगली - सांगली जिह्यात शुक्रवारी कोरोनाचा १६ वा बळी गेला आहे. तर दिवसभरात २८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील १० जणांचा समावेश आहे. तसेच उपचार घेणारे ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३०३ तर आजपर्यंत एकूण ६१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २९८ जण कोरोनामुक्त आणि १६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात शुक्रवारी आणखी २८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील १० जणांचा समावेश. तसेच उपचार घेणाऱ्या एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे येथील ६२ वर्षिय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
सांगलीमध्ये कोरोनाचा १६ वा बळी; सक्रिय रुग्णांची संख्या ३०३ वर - sangli corona update
शुक्रवारी दिवसभरात वाढलेले रुग्ण व कोरोनामुक्त व्यक्ती त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ३०३ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली,असून यापैकी आतापर्यंत २९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाची लागण झालेले नवीन रुग्ण -
जत तालुक्यातील उमदी १, पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील ६, वाळवा तालुक्यातील खेड १ आणि वाळवा ४, इस्लामपूर २, शिराळा तालुक्यातील येळापूर येथील १, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज १, मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे २ रुग्ण आढळले आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रातील १० जणांना कोरोना लागण झाली आहे. सांगली शहरातील ७ जण असून यामध्ये कोल्हापूर रस्ता चौगुले प्लॉट येथील ४, अरिहंत कॉलनी येथील १, माने प्लॉट २, आणि मिरजेतील रेवणी गल्ली येथील ३ असे एकूण जिल्ह्यातील २८ जणांचा समावेश आहे. सर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणारे ९ जण हे शुक्रवारी कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.