महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिरजमध्ये आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून मिरजमध्ये दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले, सलीम सय्यद (47) आणि मरियम सय्यद(40) असे या दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिरजमध्ये आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
मिरजमध्ये आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Apr 27, 2021, 9:46 PM IST

सांगली - आर्थिक विवंचनेतून मिरजमध्ये दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले, सलीम सय्यद (47) आणि मरियम सय्यद(40) असे या दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिरज शहरातील रेल्वे स्टेशन नजीकच्या खाँजा वसाहत या ठिकाणी ते राहात होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आर्थिक अडचणीमध्ये होते. अखेर त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा केला. यावेळी सय्यद हे गळफास घेतलेल्या तर त्यांची पत्नी मरियम या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

मिरजमध्ये आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

सय्यद दाम्पत्य खाँजा वसाहतील एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. सलीम सय्यद यांचा पानाच्या टपरीचा व्यवसाय होता. मात्र शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांची टपरी गेल्या काही दिवसांपासून बंद होती, गेल्या वर्षी लॉकाडऊन काळात देखील टपरी बंद ठेवावी लागल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते, त्यांच्यावर बचत गटाचे कर्ज होते. हे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला होता, आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केली.

हेही वाचा -'निवडणूक आयोगच्या अध्यक्षांना केंद्र सरकारने राज्यपालपद बहाल केल्याची चर्चा'

ABOUT THE AUTHOR

...view details