सांगली - एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुपवाड येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये विषारी औषध प्राशन करून एकाच साडीला दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली ( Couple Suicide In Sangli ) आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ( Kupwad MIDC Police Station ) आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
कुपवाडमधील जुना बुधगाव रोडवरील करनाळे मळ्यात नांद्रेकर यांच्या शेतातल्या पत्र्याच्या शेडमध्ये या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. कीटकनाशक, विषारी औषध प्राशन करून लोखंडी अँगलला एकाच साडीला गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या ( Suicide By Hanging On Sari ) केली. राजू महादेव माळी ( वय ३५, रा. जुना बुधगाव रोड, कुपवाड, मूळ गाव बब्लेश्वर, विजापुर ) आणि रीना किरण पार्लेकर ( वय ३० रा. वखार भाग, मिरज ) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.