सांगली - कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातही प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे नागरिक पालन करत आहेत. आपल्या प्रभागात कोरोनापासून बचाव करण्यासाठी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी फवारणी करून घेतली. यावेळी त्यांनी चक्क घोड्यावर बसून फेर फटका मारत फवारणी करून घेत गाडीचा वापर टाळला.
ड्यावरून नगरसेवकाने मारला प्रभागात फेरफटका. सध्या आत्यावशक वगळता सर्व सेवा बंद आहेत. पेट्रोलही मिळत नसल्याने नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी घोड्याचा वापर केला. कार्यकर्ते पेट्रोलची मागणी करत आहेत. त्याला फाटा देत आपणच घोड्यावरून फिरावे म्हणून त्यांनी घोड्याचा वापर केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींना आपल्या प्रभागात जाऊन नागरिकांच्या दररोजच्या अडचणी समस्या जाणून घेणे हे जवळपास बंद झालं आहे. विनाकारण दुचाकी वापरण्याला पोलिसांनी बंदी आणली आहे. मात्र कठीण काळात नागरिकांच्या समस्या तर जाणून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे सांगलीतल्या एका नगरसेवकांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट घोड्यावरून हा नगरसेवक प्रभागात पोहोचला. मंगेश चव्हाण असे या नगरसेवकाचे नाव असून घोड्यावर स्वार होत चव्हाण यांनी आपल्या प्रभागात फेरफटका मारला.
मंगेश चव्हाण यांनी औषध फवारणी करत नागरिकांशी संवाद साधला. प्रभागात फिरताना कार्यकर्ते पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे करत होते. त्यामुळे त्यांनी कंटाळून स्वतःची दुचाकी वापरणे बंद करून घोड्याचा पर्याय वापरत कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.