महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू, १६७ रुग्णांची भर - सांगली कोरोना रुग्णसंख्या

दिवसभरात जिल्ह्यात तब्बल १६७ नव्या रुग्णांची भर पडली आहे.ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे पालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.

सांगली कोरोना
सांगली कोरोना

By

Published : Jul 29, 2020, 10:26 PM IST

सांगली - जिल्ह्यात बुधवारीही कोरोनाचा कहर कायम आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १६७ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ११६ जणांचा समावेश आहे.

उपचार घेणारे ४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या १,०४३ तर एकूण आकडा २,०६५ झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी यामध्ये कोरोना रुग्णांची भर कायम आहे. तर उपचार घेणाऱ्या सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील ०३, मिरज शहरातील ०२ आणि कडेगाव येथील ०१ अशा ६ जणांचा समावेश आहे.

तर दिवसभरात जिल्ह्यात तब्बल १६७ नव्या रुग्णांची भर पडली आहे.ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे पालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. बुधवारी दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ११६ जणांना कोरोना लागण झाली आहे.ज्यामध्ये सांगली शहरातील ९१ आणि मिरज शहरातील २५ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण -
१ ) आटपाडी तालुक्यामधील एकूण ०५,
२) जत तालुक्यामधील एकूण ०६,
३) खानापूर तालुक्यामधील एकूण - ०१,
४) मिरज तालुक्यामधील एकूण - ०६,
५) पलूस तालुक्यामधील एकूण - ०२,
६) वाळवा तालुक्यामधील एकूण - ०१,
७) तासगाव तालुक्यामधील एकूण - ०३,

तर उपचार घेणारे तब्बल ४२ जण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यता आले आहे.

तसेच कोरोना उपचार घेणारे ३३ जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील २० जण हे ऑक्सिजनवर तर ११ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १,०४३ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,०६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आजपर्यंत ९५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर ७० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details