महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपंचमीवर कोरोनाचे सावट, शिराळा नगरीवर ड्रोनची असणार नजर - नागपंचमी लेटेस्ट न्यूज

जगप्रसिद्ध शिराळा येथील नागपंचमी यंदाही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून शिराळ्याची नागपंचमी कायद्याच्या चाकोरीत साजरी केली जात आहे. शेकडो वर्षांची परंपरा शिराळाच्या नागपंचमीला आहे. काही वर्षांपर्यंत या ठिकाणी घरोघरी जिवंत नागांची पूजा केली जात असे, प्रत्येक घरात नागाला भाऊ मानून महिला त्याचे पूजन करत असतं, तर शहराच्या प्रसिद्ध अंबामाता मंदिराच्या समोर जीवंत नागांचे प्रदर्शन आणि त्यानंतर गावातून सवाद्य मिरवणूक निघायची.

Corona's Impact on Nag Panchami
नागपंचमीवर कोरोनाचीही सावट

By

Published : Aug 13, 2021, 7:34 AM IST

Updated : Aug 13, 2021, 7:50 AM IST

सांगली - न्यायालयाचे आदेश आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शिराळा येथील नागपंचमी साध्या पध्दतीने साजरी होत आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा येथे बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी तर संपूर्ण शिराळ्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांसोबत ड्रोन कॅमेरेही तैनात असणारा आहेत.

शिराळा नगरीवर ड्रोनची असणार नजर
  • शेकडो वर्षांची नागपंचमीचे परंपरा -

जगप्रसिद्ध असणाऱ्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदाही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून शिराळ्याची नागपंचमी कायद्याच्या चाकोरीत साजरी केली जात आहे. शेकडो वर्षांची परंपरा शिराळाच्या नागपंचमीला आहे. काही वर्षांपर्यंत या ठिकाणी घरोघरी जिवंत नागांची पूजा केली जात असे, प्रत्येक घरात नागाला भाऊ मानून महिला पूजन करत असतं, तर शहराच्या प्रसिद्ध अंबामाता मंदिराच्या समोर जिवंत नागांचे प्रदर्शन आणि त्यानंतर गावातून सवाद्य मिरवणूक निघायची. मात्र 2002 रोजी प्राणी मित्र संघटनेने यावर आक्षेप घेत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने शिराळ्याच्या नागपंचमीवर अंकुश ठेवत जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घातली.

  • कशी सुरू झाली परंपरा -

12 व्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळामध्ये भिक्षा मागण्यासाठी आले होते. यावेळी नागपंचमीचा सण होता. चिखलाच्या नागाला पूजण्यात महिला व्यस्त होत्या, त्यामुळे गोरक्षनाथ महाराजांना भिक्षा देण्यास वेळ झाला. महाराजांनी वेळ का झाला, असे विचारले असता नागाचे पूजन चालू होते, असे म्हटल्यावर गोरक्षनाथ यांनी जिवंत नाग प्रकट केला आणि जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितले. तेव्हापासून शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली, अशी आख्यायिका आहे. यानंतर शिराळ्यामध्ये दरवर्षी नागपंचमीला घरोघरो जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली. या दिवशी शिराळाकर महिला एक दिवसाचा उपवास करतात आणि जिवंत नागाला भाऊ मानून त्याची पूजा करतात. यानंतर गावातील तरुण मंडळी नागांची मिरवणूक काढतात, अशी परंपरा होती.

  • प्रवेश बंदी आणि ड्रोन कॅमेऱ्याची नजर -

मात्र या जगप्रसिद्ध नागपंचमीवर न्यायालयाच्या आदेशाबरोबर कोरोनाचे सावट आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यात येत आहे. जिवंत ऐवजी मातीच्या नागांचे पूजन आता घरोघरी पार पडत आहे. मिरवणूक ही बंद झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकटाचे सावट ही या नागपंचमी उत्सवावर पाहायला मिळत आहे. तर यंदाही कडक नियमांचे पालन करत नागपंचमी साजरी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात आली आहेत. शिराळा नगरीत नागपंचमीच्या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 14 ऑगस्टपर्यंत ही बंदी ठेवण्यात आली आहे. तसेच नागपंचमीचे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पालन करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून शिराळा नगरीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा हे सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त शिराळामध्ये तैनात असणार आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने यंदाही शिराळ्याची नागपंचमी साजरी होणार आहे.

  • केंद्राने आणि राज्याने पुढाकार घ्यावा -

आजही शिराळाकर नागरिकांच्या भावना जिवंत नागांच्या पूजा करणेबाबत कायम आहेत. न्यायालयाने याबाबत विचार करण्याची मागणी वारंवार शिराळकर नागरिक करत असतात. याबाबत न्यायालयीन लढाई देखील दिली. मात्र, ती निष्फळ ठरली. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून याबाबत पुढाकार घेऊन समस्त शिराळकरांच्या आस्थेचा असणारा जिवंत नागांच्या पूजेला पून्हा परवानगी द्यावी, अशी मागणी शिरोळाकर करत आहेत.

हेही वाचा -जून महिन्यातील कोरोना रुग्ण निघाला डेल्टा पॉझिटिव्ह; तब्बल एक महिन्यानंतर आला अहवाल

Last Updated : Aug 13, 2021, 7:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details