सांगली - मुंबई स्थित कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सांगलीच्या रेठरे धरण येथील कुटुंबासह २४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर आणखी ६ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..
सांगली जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याची दिलासादायक बातमी येत असताना रविवारी मुंबई राहणाऱ्या सांगलीतील वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील ६५ वर्षीय व्यक्ती ही मुंबईमध्ये एका बॅंकेत नोकरीस आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
सदर कोरोनाबाधित रुग्ण ही २० मार्च रोजी मुंबईमधून आपल्या गावी रेठरे धरण येथे आला होता. २० दिवस त्याचे गावी वास्तव्य असताना १० एप्रिल रोजी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने मुंबई येथे नियमित उपचार सुरू असलेल्या अपोलो रुग्णालयात रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
हेही वाचा...महाविद्यालयीन परीक्षा होणारच ! मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
यानंतर प्रशासना आणि संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.यानंतर उपयोजना म्हणून रेठरे धरण गाव सील करत.त्या कोरोना बाधित कुटुंब आणि त्याच्या संपर्कातील ३० जणांना ताब्यात घेऊन मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल करत त्यांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आले होते.आणि या पैकी २४ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. तर 6 जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे.