सांगली - लस साठा संपल्याने ठप्प झालेली लसीकरण मोहीम आता पुन्हा सुरू झाली आहे. जिल्ह्याला 66 हजार कोरोना लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. 2 दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. आता डोस उपलब्ध झाल्याने लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.
माहिती देताना आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे हेही वाचा -कोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक सांगलीत दाखल
ठप्प लसीकरण पुन्हा सुरू
सांगली जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला लसीचा साठा संपल्याने ब्रेक लागला होता. त्यामुळे, 2 दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. लसीचा साठा संपल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून राज्य शासनाकडे 2 लाख लसींची मागणी केली होती. आणि शासनाकडून 66 हजार डोस उपलब्ध झाले असून, 4 दिवस हे डोस पुरतील, असा प्रशासनाला अंदाज आहे.
जिल्ह्यामध्ये दिवसाला सरासरी पंधरा हजार ते अठरा हजार लोकांचे लसीकरण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अडीच लाख लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. आणि आता उपलब्ध झालेल्या लसीच्या साठ्यामुळे जिल्ह्यात पुन्हा 227 केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे यांनी सांगितली.
हेही वाचा -संभाजी भिडे म्हणाले- कोरोना अस्तित्वात नाही, जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील