महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिरजमध्ये विनाकार बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट - सांगली कोरोना टेस्ट अपडेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहेत. बाहेर फिरणाऱ्या अशा नागकिकांची जिल्ह्यात कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. सोमवारी मिरज शहरात सकाळपासून अनेक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या 100 हुन अधिक व्यक्तींना पकडून त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली.

विनाकार बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट
विनाकार बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट

By

Published : Apr 26, 2021, 5:31 PM IST

सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहेत. बाहेर फिरणाऱ्या अशा नागकिकांची जिल्ह्यात कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. सोमवारी मिरज शहरात सकाळपासून अनेक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या 100 हुन अधिक व्यक्तींना पकडून त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यांची रवानगी गृह विलगीकरणात करण्यात येत आहे.

विनाकार बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास गृह विलगीकरणात रवानगी

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चाप लावण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. आज मिरजमध्ये 100 हून अधिक जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. तसेच अनेकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान जे नागरिक कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडत आहेत, अशा नागरिकांचे घरामध्येच विलगीकरण करण्यात येत असल्याची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी दिली आहे.

हेही वाचा -टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका, गोपीनाथ पडळकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details