सांगली - एका कोरोनाबाधित रुग्णाने गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन,असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र नातेवाइकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयातच केली आत्महत्या.. सांगलीतील घटना - कोरोना रुग्णाची आत्महत्या
मिरजेच्या सरकारी रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
सांगलीत कोरोनाबाधिताची आत्महत्या
मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा देत, सदर घटनेच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्या आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती डॉ. सुधीर ननंदकर यांनी दिली आहे.
तर, हुसेन मोमीन यांनी नेमकी कोणत्या करणातून आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नसून, या आत्महत्येची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे.