सांगली- कोरोनाच्या भीतीने जिल्ह्यात माणुसकीचा अंत झाला झाला तर नाही ना? अशी प्रश्न पडावा, अशी घटना समोर आली आहे. एका मृत तरुणाला कोरोना होता, अशी सोशल मीडियावर अफवा पसरली. या अफवेने त्या मृताच्या नातेवाईकांना कोणीच वाहन न दिले नाही. त्यामुळे कचरा गाडीतून मृतदेह नेत अंत्यसंसस्कार करण्यात आले.
सांगलीच्या जतमध्ये एका तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. जिल्ह्यातुन सदर तरुण 11 मे रोजी जत या शहरात परतला होता. त्यानंतर 14 दिवसांसाठी तरुणाला होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, त्या तरुणाला त्रास होऊ लागल्याने जतमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर जत शहरात तरुणाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याची जोरदार अफवा सोशल मीडियावर पसरली होती. जत शहर आणि नगरपालिका यंत्रणा हादरून गेली होती. मात्र या तरुणाचा मृत्यू हा अन्य कारणाने झाल्याचे समोर आले.
हेही वाचा-'राज्यांनी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देण्यासाठी पुढे यावे'
मृत तरुणाच्या नातेवाईकांनी टाळेबंदीची परिस्थिती असल्याने जत नगरपालिका प्रशासनाला अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. प्रशासनाकडून सर्व त्या खबरदार्या घेऊन मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्या मृत तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या एका कचरा घंटागाडीमधून नेण्यात आला. कचरा गाडीतून मृतदेह नेल्याचा व्हिडिओ समोर आल्याने जत शहरात खळबळ उडाली आहे. नगरपालिका प्रशासनामधील माणुसकी संपली आहे का? असा संतप्तपणे सवाल केला जात आहे. याबाबत जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित हाराळे यांच्याशी संपर्क साधला असता, तरुणाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.