सांगली - हजारो वर्षापासून संपन्न होत असलेली शिराळ्याची नागपंचमी यावर्षी कोरोनामुळे साजरी होऊ शकत नाही. त्यामुळे दीर्घ परंपरेत प्रथमच खंड पडणार आहे. नागपंचमी व शिराळ्याचे अतूट नाते आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार येथील जिवंत नागाची पूजा बंद झाली असली तरी प्रतिकात्मक नागप्रतिमेची पूजा केली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे यावर देखील मर्यादा आल्या आहेत. दरवर्षी नागपंचमीच्या आदी अंबामाता मंदिर परिसर गजबजलेला असायचा.
हजारो वर्षांपासून चालत आलेल्या शिराळा नागपंचमीची परंपरा खंडीत - SANGLI NAGPANCHAMI CORONA EFFECT
दरवर्षी, अंबामाता परिसर विविध प्रकारची दुकाने आणि गर्दीने फुलून जायचा. मात्र, आता याच परिसरात कोविड रुग्णालय असल्याने शुकशुकाट पसरला आहे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नागपंचमी दिवशी अंबामाता मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
दरवर्षी, अंबामाता परिसर विविध प्रकारची दुकाने आणि गर्दीने फुलून जायचा. मात्र, आता याच परिसरात कोविड रुग्णालय असल्याने शुकशुकाट पसरला आहे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नागपंचमी दिवशी अंबामाता मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असून, महाजनांच्या घरातील मानाची पालखी पुजण्यासाठी फक्त दहा लोकांना परवानगी दिलेली आहे. याचबरोबर शिराळ्यातील सर्व नागरिकांनी घरात राहूनच नागप्रतिमेची पूजा करून प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अर्चना शेटे यांनी शिराळावासियांना केले आहे. शुक्रवारपासून तीन दिवस ड्रोनच्या साहाय्याने शिराळा नगरीवर लक्ष ठेवणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.