महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना चेक पोस्ट सुरू, तपासणीनंतर कर्नाटकमध्ये प्रवेश - corona maharashtra news

ज्या प्रवाश्यांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून येत आहेत. तसेच ज्या प्रवाश्यांनी कोरोनाच चाचणी केली नाही, अशा संशयास्पद प्रवाश्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यात बंदी घातली असल्याचे कागवड आरोग्य विभागाचे हेल्थ ऑफिसर जे.डी.मुजावर यांनी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक कोरोना
महाराष्ट्र-कर्नाटक कोरोना

By

Published : Feb 21, 2021, 3:29 PM IST

सांगली- महाराष्ट्र आणि केरळ राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाश्यांवर कर्नाटक सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटकच्या कागवड या ठिकाणी चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात येत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना चेक पोस्ट सुरू
बॉर्डरवर कोरोना चेकपोस्ट सुरू..देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्रात आणि केरळमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा धसका कर्नाटक राज्याने घेतला आहे. बाहेरून आपल्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना बाबत कडक धोरण घेतले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी कर्नाटक सरकारकडून कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यलगत असणाऱ्या कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कागवाड या ठिकाणी चेक पोस्ट सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्याच्यामार्गे अनेक प्रवासी हे कर्नाटक राज्यात जातात. त्यामुळे आता या चेक पोस्टवर कोरोना चाचणी आणि नियमांच्या पालनबाबत सक्तीच्या सूचना देण्यात येत आहे. कर्नाटक पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून या चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्याचबरोबर मास्क घालण्याबरोबर सोशल डिस्टंसिंग पाळण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. संशयास्पद व्यक्तींना प्रवेश नाही..ज्या प्रवाश्यांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून येत आहेत. तसेच ज्या प्रवाश्यांनी कोरोनाच चाचणी केली नाही, अशा संशयास्पद प्रवाश्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यात बंदी घातली असल्याचे कागवड आरोग्य विभागाचे हेल्थ ऑफिसर जे.डी.मुजावर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details