महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तंतूवाद्य व्यवसायाला घरघर...लॉकडाऊनमुळे पारंपारिक कला लुप्त होण्याच्या मार्गावर

संगीताची देवी सरस्वती,आणि देवीच्या हातात असलेला तानपुरा शास्त्रीय संगीताचा गाभा आहे. गायकाचे स्वर या तंबोरा,तानपुरा यामुळेचं बहारदार बनतात. संगीत क्षेत्रातल्या या साहित्याची निर्मिती मिरज शहरामध्ये केली जाते. त्यामुळे भारतीय संगीत क्षेत्राला मिरजेत निर्माण होणारे तंतूवाद्य जणू देणगी आहे.

sangli corona update
तंतूवाद्य व्यवसायाला घरघर...लॉकडाऊनमुळे पारंपारिक कला लुप्त होण्याच्या मार्गावर

By

Published : Oct 23, 2020, 8:50 AM IST

Updated : Oct 23, 2020, 9:22 AM IST

सांगली - मिरजेतील तंतूवाद्य हे भारतीय संगीत क्षेत्राला लाभलेली एक देणगी आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगीत क्षेत्राला देणगी असणार हा व्यवसाय ठप्प झाल्याने संकटात सापडला आहे. त्यामुळे दीडशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर आहे. मिरज शहर आज आरोग्य पंढरी म्हणून ओळखला जाते. पण त्याहूनही एक वेगळी ओळख संगीत क्षेत्रामध्ये आहे,ती म्हणजे "तंतूवाद्यांचे माहेरघर" म्हणून..

तंतूवाद्य व्यवसायाला घरघर...लॉकडाऊनमुळे पारंपारिक कला लुप्त होण्याच्या मार्गावर
संगीताची देवी सरस्वती,आणि देवीच्या हातात असलेला तानपुरा शास्त्रीय संगीताचा गाभा आहे.गायकाचे स्वर या तंबोरा,तानपुरा यामुळेचं बहारदार बनतात.संगीत क्षेत्रातल्या या साहित्याची निर्मिती मिरज शहरामध्ये केली जाते. त्यामुळे भारतीय संगीत क्षेत्राला मिरजेत निर्माण होणारे तंतूवाद्य जणू देणगी आहे.
संगीताची देवी सरस्वती,आणि देवीच्या हातात असलेला तानपुरा शास्त्रीय संगीताचा गाभा आहे.
दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या तंतूवाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक कारागीर यामध्ये कार्यरत आहेत. तंतूवाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच येथे वसली आहे. त्यामुळे तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून आज मिरज शहराला ओळख प्राप्त झाली आहे. शहरातील असणाऱ्या सतारमेकर गल्लीसह अनेक घरांमध्ये तानपुरे, तंबोरे, वीणा, गिटार अशा अनेक वाद्यांची निर्मिती होते. अत्यंत कुशल कारागिरी या तंतूवाद्यात पाहायला मिळते. त्यामुळेच देशातच नव्हे तर परदेशातही मिरज शहरात बनवल्या जाणाऱ्या तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकीत कलाकारांकडून मागणी असते. भारतातल्या अनेक दिग्गज शास्त्रीय संगीतकारांच्या हातात मिरज शहरातले तानपुरे, तंबोरे, वीणा असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगीत क्षेत्राला देणगी असणार हा व्यवसाय ठप्प झाल्याने संकटात सापडला आहे.
मात्र, लॉकडाऊनमुळे संगीत मैफिली, यात्रा, जत्रा सर्व कला क्षेत्रावर बंदी आली. याचा प्रत्यक्ष फटका मिरज शहरातल्या तंतुवाद्य व्यवसायाला बसला. यामुळे शहरातले जवळपास अनेक सतार व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे तंतूवाद्य विक्री पूर्णपणे थांबली. त्यामुळे अनेक वाद्य ही दुकानात विक्री अभावी पडून राहिली आहेत. परिणामी सतारमेकर गल्लीत गेल्या सात महिन्यांपासून वाद्य विक्रीचा शुकशुकाट आहे. हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा कारागीर दुकानात मागणी नसताना देखील काम करत आहेत. त्याचा अधिक भार तंतूवाद्य व्यावसायिकांवर पडत आहे.
भारतातल्या अनेक दिग्गज शास्त्रीय संगीतकारांच्या हातात मिरज शहरातले तानपुरे, तंबोरे, वीणा असतात.

एका कारागिराला महिन्याकाठी पंधरा हजार रुपये इतका पगार द्यावा लागतो, जवळपास मिरज शहरा मधील अडीचशे ते तीनशे कारागीर तंतुवाद्य निर्मितीचे काम करतात. मात्र मागणी नसल्याने अनेकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांना सध्या महिन्याकाठी पाच हजार रुपये सुद्धा कमावणे अडचणीचे आहे. तंतू वाद्यांची कुशल कारागिरी करणाऱ्या अनेक कारागिरांना अन्य व्यवसायाकडे वळावे लागत आहे. तर सध्याची कोरोना आणि लॉकडाउनचे परिणाम हे या व्यवसायावर पुढील काही महिने असेच राहणार आहेत. त्यामुळे हा व्यवसाय आणि कला लुप्त होईल, अशी भीती तंतुवाद्य व्यवसायिक मोहसीन सातारकर यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय संगीत क्षेत्राला मिरजेत निर्माण होणारे तंतूंवाद्य जणू देणगी आहे.
अनेक वर्षांपासून या तंतुवाद्यांचा निर्मिती क्षेत्रामध्ये नावाजले जाणारे बाळासाहेब सातरमेकर यांचे मते भारतीय संगीत क्षेत्राला मिरज शहरातले तंतुवाद्य ही एक मिळलेली अभिजात देणगी आहे.आज जरी डिजिटल तानपुरे असले,तरी लाकडी तानपुऱ्यांना मागणी आहे. त्यामुळेच देशातील आणि परदेशातील गायक मिरजमध्ये बनवल्या जाणाऱ्या तंतूवाद्यांच्या बाबतीत आग्रही असतात.
तंतूवाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच मिरजेत वसली आहे.
या ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या वीणेला पंढरपूरच्या कार्तिकी आणि एकादशी वारी दरम्यान मोठ्या प्रमाणात मागणी असते, मात्र यंदा कोणतीही वारी होऊ शकली नाही, शिवाय रेल्वे वाहतूक बंद असल्याने देशात आणि विमानसेवा बंद असल्याने परदेशातही इथली तंतूवाद्य पोहोचू शकले नाहीत. या सर्वांचा परिणाम तंतूवाद्य व्यवसायावर झाला आहे. परिणामी निर्मिती ठप्प झाल्याने कारागीरही इतर व्यवसायांकडे वळत आहेत. त्यामुळे कारागिरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये तंतूवाद्य निर्मितीची कला खरंतर जोपासणेसाठी राज्य शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. अखिल भारतीय हस्तकला महामंडळाच्या माध्यमातून या व्यवसायाला मदत मिळू शकते,आणि तशी मागणीही आपण केली आहे,त्यामुळे सरकारने त्याच्याकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे,असं मत बाळासाहेब सतारमेकर यांनी व्यक्त केले आहे.
अत्यंत कुशल कारागिरी या तंतूवाद्यात पाहायला मिळते.
युवा सतार व्यवसायिक आणि पिढीजात तंतूवाद्य निर्मितीची कला जोपासण्याचं काम करणारे अतिक सतारमेकर यांच्या तंतुवाद्यांना चीन,स्पेन,जपान यासह अनेक देशातून मागणी आहे,याशिवाय भारता मध्येही त्यांच्या तंतुवाद्यांना पसंती देण्यात येते. मात्र लॉकडाऊनचा मोठा फटका त्यांना बसला आहे. कोरोनाच्या आधी पाठवलेले अनेक तंतूवाद्य हे विमान सेवा ठप्प झाल्याने पोस्ट ऑफिसच्या गोडाऊनमध्ये अडकून पडले आहेत. शिवाय अतिक यांना मार्च महिन्यात स्पेन मधून एका तंबोऱ्याची ऑर्डर मिळाली होती आणि त्यानुसार त्यांनी एक ते दीड महिन्यात तंबोरा तयारीही केला. मात्र अद्याप विमानसेवा ठप्प असल्याने तो तंबोरा पॅकिंग करून त्याच्या दुकानात पडून आहे.

दुसऱ्या बाजूला देशातील रेल्वे सेवा ही ठप्प झाल्याने मागणी असून देशांतर्गत कोठेही तंतूवाद्य पाठवणे शक्य नव्हते, त्यामुळे कोरोनाचा मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे,असे मत अतिक सतारमेकर यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाचा फटका अनेक स्तरावर वेगवेगळ्या व्यवसायांना बसला आहे. मिरजेचा तंतुवाद्य व्यवसायही या संकटातून सुटलेला नाही. मात्र शेकडो वर्षांची परंपरा आणि संगीत क्षेत्राला लाभलेली देणगी जोपासण्यासाठी राज्य शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे, अन्यथा सप्तसुरांना साथ देणारे तंतूवाद्य लुप्त होतील,अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Oct 23, 2020, 9:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details