सांगली- जगात हिंदुस्थान निर्लज्जपणेत क्रमांक एकचा देश असून बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. तसेच कोरोना हा काल्पनिक असून तो ना तर स्त्री, ना तर पुरुष अश्या प्रवृतीच्या माणसांन होणारा रोग पुनरूच्चार देखील भिडे यांनी केला आहे. सांगलीमध्ये दुर्गामाता दौड समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदुस्तान बेशरम लोकांचा देश असून निर्लज्जपणातही क्रमांक एकवर शिवप्रतिष्ठानची दुर्गामाता दौड -
सांगली मध्ये दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने दुर्गामाता दौडीच्या आयोजन करण्यात येतं, नवरात्रा निमित्ताने पार पडणाऱ्या दुर्गामाता दौड मध्ये हजारो धारकरी सहभागी होतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गामाता दौड रद्द करण्यात आली आहे. केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये दौड पार पडली आहे.या विजयादशमी दिवशी या दौडीचा समारोप पार पडला आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात धावकऱ्यांना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मार्गदर्शन करताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान आहे केले आहे.
निर्लज्जपणात 1 नंबरचा देश -
जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला हा देश आहे. क्रमांक एकवर हा देश कधी येणार? पण क्रमांक एक आपण मिळवला आहे. पण कुठल्या गोष्टीत तर लोकसंख्येत आपल्याला जमलं नाही. चीन यामध्ये पुढे आहे आणि चीन आपला कट्टर दुश्मन, मारेकरी, शत्रू आहे. पण आपण निर्लज्जपणात क्रमांक एक मिळवला आहे. जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात प्रदात्या, पारतंत्र्य, गुलामी, नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, असा बेशरम लोकांचा 1 अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे.
बेशरम लोकांचा देश हिंदुस्थान -
देशाच्या देहात प्राण नाही, तो म्हणजे देशवृतीचा, धर्मवृत्तीचा, स्वाभिमानाचा आपण कोण आहोत? याची जाणीव नाही. कश्यासाठी जगायचे तर पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी इतकीच त्यांची लायकी आहे. अशा बेशरम लोकांचा देश म्हणजे आपला देश आहे. आणि तो आज आहे का? तर तो प्रदीर्घ काळापासून आहे. या सगळ्या दोषावर मात केली पाहिजे. आपल्यात फार मोठा दोष आहे. आपलं कोण, परकं कोण, शत्रू कोण, वैरी कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव एकाही माणसाला राष्ट्र पातळीवर नसते. यथा राजा, तथा प्रजा काय कसली सरकार आपल्या देशात आहेत. स्वच्छ, शुद्ध, उदात्त, पवित्र असा राज्यकर्ता आपल्याला मिळत नाही. आमच्यामध्ये देश वृत्तीचा कस नाही, ही उणीव कशी भरून काढायची?
कोरोना हा तर काल्पनिक -
दुर्गामाता दौडीवर बंदी घालणाऱ्या राज्यकर्त्यांचे अकला विकारवश झाल्या आहेत.तसेच महाराष्ट्रातील कर्तृत्वसंपन्न शासनाने कोरोनामुळे गडकोट मोहिमेवर बंदी घातली. पण कोरोना हा काल्पनिक आहे. तो ना तर स्त्री, ना तर पुरुष अश्या प्रवृतीच्या माणसांन होणारा रोग आहे. तो एक थोतांड आहे, चीन ने आपल्याला पालथे पाडण्यासाठी केलेली ही बदमाशी आहे. हे कळायला आपल्या हृदयात शिवाजी,संभाजी महाराज ठेवावा लागतो. त्याच्याशिवाय ते कळत नाही.दुर्दैवाने महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या हृदयात शिवाजी, संभाजी महाराजांची वस्ती नाही. ती असती तर सबंध देशाचे राज्यकर्ते ठरले असते.पण या बेशरम सरकारने दुर्गामाता दौडीवर बंदी घातली,मात्र लॉकडाऊन उठल्यानंतर एकविसाव्या दिवशी महसूल वाढीसाठी दारू विक्री सुरू केली,असे नालायक सरकार आहे. अश्या शब्दात संभाजी भिडे यांनी टीका केली आहे.