सांगली - भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापूर मध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले आहेत. आटपाडी तालुक्यात अनेक ठिकाणी पडळकर समर्थकांकडून राष्ट्रवादी विरोधात रस्ता रोको आंदोलन केले आहे. त्यांनी टायर पेटवून निषेध व्यक्त केला आहे.
पडळकरांवरील हल्ल्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात पडळकर समर्थक रस्त्यावरसोलापूर दौऱ्यावर असणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बुधवारी सायंकाळी हल्ला झाला आहे. त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले आहेत. आटपाडी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये पडळकर समर्थकांनी रस्त्यावर उतरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले आहे. करगणी या ठिकाणी पडळकर समर्थकांनी रास्तारोको केले. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधार्थ टायर पेटवून निषेध केला. कुठे रास्ता रोको तर कुठे चक्का जाम
निंबवडे या ठिकाणीही पडळकर समर्थकांनी रस्त्यावर उतरत चक्का जाम आंदोलन केले. तर आमदार पडळकर यांचे गाव असणाऱ्या झरे या ठिकाणीही समर्थकांनी जोरदार आंदोलन केले. रस्ता रोको करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लेखोरांना तातडीने अटक करावे. आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मागणी केली जात आहे.
हेही वाचा -भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वाहनावर दगडफेक