सांगली- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. पेट्रोल पंपावर जाऊन वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन दरवाढीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पेट्रोल व डिझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; पंप आणि वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन दरवाढीच्या दिल्या शुभेच्छा
देशातील जनतेने भाजपला एक हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सरकारकडून जनतेच्या माथ्यावर महागाईचा भडीमार करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
नुकतेच केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. याचे संतप्त पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. मात्र, सांगली जिल्हा काँग्रेसकडून या दरवाढीच्या नागरिकांना शुभेच्छा देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील काही पेट्रोल पंपावर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी पंपचालकांना गुलाबपुष्प देण्यात आले. त्याचबरोबर वाहनधारकांनाही गुलाबपुष्प देऊन वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेल दराबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. केंद्रातले सरकार फसवे सरकार असल्याचे गांधीगिरी आंदोलनातून दर्शवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
देशातील जनतेने भाजपला एक हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सरकारकडून जनतेच्या माथ्यावर महागाईचा भडीमार करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.