सांगली- पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आज (दि. 8 मार्च) अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. दुचाकी व प्रतीकात्मक गॅस सिलिंडरला फासावर लटकवत, दोघांनी महागाईला कंटाळून ही आत्महत्या केल्याचे दाखवत चक्क श्राद्धाचे जेवण घालत आंदोलन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये आज मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलेला आहे. जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयासमोर समोर चक्क दुचाकीला फासावर लटकवण्यात आले. त्याचबरोबर गॅस सिलिंडरच्या प्रतीकात्मक पोस्टरला ही यावेळी फासावर लटकवण्यात आले. या दोघांनीही वाढलेल्या महागाईला कंटाळून आत्महत्या केल्याचा पत्रही या ठिकाणी लावण्यात आले होते. या सर्व घटनेचा दुःख म्हणून दहावे, बारावे आणि तेरावे श्राद्धाचे जेवण या ठिकाणी घालण्यात आले.
हेही वाचा -'चार-चौघींची' कहाणी..! पोटासाठी लाज कश्याची म्हणत चालवतायत सर्व्हिसिंग सेंटर