सांगली -सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल हा दुपारी चार वाजेपर्यंत स्पष्ट होईल. मतमोजणीसाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. मतमोजणी वेळी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, दुपारी चार वाजेपर्यंत लागणार निकाल - जिल्हाधिकारी - ready
सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरवातीला पोस्टल मतमोजणी होणार असून त्याच बरोबर ईव्हीएम मशिनची मतमोजणीही सुरू होणार आहे. १० टेबलवर पोस्टल तर २० टेबलवर ईव्हीएम मतमोजणी पार पडणार आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरवातीला पोस्टल मतमोजणी होणार असून त्याच बरोबर ईव्हीएम मशिनची मतमोजणीही सुरू होणार आहे. १० टेबलवर पोस्टल तर २० टेबलवर ईव्हीएम मतमोजणी पार पडणार आहे. या मतमोजणीसाठी ६२० कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६ हजार हून अधिक पोलिसांसह कर्मचारी तैनात असणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली आहे. या मतमोजणीमध्ये ५ व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी होणार आहे. या मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः चार वाजण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी पारदर्शी पार पाडण्याचा निर्देश असल्याने मतमोजणी प्रक्रिये दरम्यान कोणाची, कोणतीही हयगय खपवून घेतले जाणार नाही. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास फौजदारी दाखल केली जाईल, असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे.