महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रह्मनाळ घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार - मुख्यमंत्री

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळमध्ये कृष्णा नदीच्या महापुरात पूरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर करताना बोट पलटून घडलेल्या दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेले आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांनी 3 दिवसांपासून  प्रशासनाकडे बोट देण्याची मागणी केली होती. मात्र, वेळेत बोट उपलब्ध होऊ शकली नसल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

ब्रह्मणाळ घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 10, 2019, 7:24 PM IST

सांगली - महापुरातील ब्रह्मनाळमध्ये घडलेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखर घेतली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सांगलीमध्ये पूरस्थिती आढावा घेताना ते बोलत होते.

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळमध्ये कृष्णा नदीच्या महापुरात पूरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर करताना बोट पलटून घडलेल्या दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेले आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांनी 3 दिवसांपासून प्रशासनाकडे बोट देण्याची मागणी केली होती. मात्र, वेळेत बोट उपलब्ध होऊ शकली नसल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

ब्रह्मनाळ येथील घडलेली घटना दुर्दैवी आहे. मृताच्या कुटुंबाना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. या सर्व घटनेची सखोल चौकशी करून यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details