महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रह्मनाळ दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन

सांगली जिल्ह्यातील ८ लोक बेपत्ता झाले असून, कोल्हापुरातील २ जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यातील २७ हजार ४६७ हेक्टर जमिनीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला असून, त्यावरची पिके नष्ठ झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री

By

Published : Aug 10, 2019, 4:39 PM IST

Updated : Aug 10, 2019, 7:31 PM IST

सांगली - ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 झाला आहे. दरम्यान, या पूरपरिस्थितीचे विरोधी पक्षांनी राजकारण करु नये, ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पूरपरिस्थितीच्या भागात लागेल ती मदत करण्यास राज्य सरकार तयार आहे. ब्रह्मनाळ घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कारवाई करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

आत्तापर्यंत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळून ३ लाख ७८ हजार लोकांना बाहेर काढले असून, ३०६ छावण्यामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी यासंबधी माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील ८ लोक बेपत्ता झाले असून, कोल्हापुरातील २ जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यातील २७ हजार ४६७ हेक्टर जमिनीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला असून, त्यावरची पिके नष्ठ झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रम्हनाळ घटनेतील मृतांचा आकडा १७ वर वाढला

ब्रम्हनाळ घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून, यामध्ये १७ जणांचा मृत्यू झला आहे. आज आणखी ५ मृतदेह हाती आले आहेत. सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीच्या महापुरात बोट उलटून ९ जण मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली गुरुवारी घडली होती. तर या बोटीतील काहीजण वाहून गेल्याने बेपत्ता झाले होते. या बेपत्ता झालेल्या नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ३ मृतदेह सापडले होते आणि आज (शनिवारी) ५ मृतदेह सापडले. एनडीआरएफच्या टीमकडून या मृतदेहांचा शोध घेण्यात आला आहे. आज सापडलेल्या या मृतदेहमध्ये ३ महिला १ मुलगा आणि १ मुलीचा समावेश आहे.


घटनेतील मृतांची नावे

सुरेखा नरुटे
रेखा वावरे (वय - 40)
अडीच वर्षाची मुलगी -
मनीषा पाटील
क्षिती पाटील (वय- ७)
राजमती चौगुले (वय -६५)
बाबासो पाटील
कल्पना कारंडे
लक्ष्मी वडेर (वय - ७०)
पियू नरुटे (दीड महिन्याची मुलगी)
सौरभ गडदे
सुवर्णा तानाजी गडदे
गंगूबाई
कस्तुरी वडेर
पप्पी ताई पाटील
सुमुन रोगे
कोमल नरुटे

कर्नाटक सरकारशी बोलणे सुरू
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी माझे बोलणे सुरू आहे. अलमट्टी धरणातून ४ लाख क्युसेकच्या पुढे विसर्ग सोडल्यास कर्नाटकमधील १२९ गावांना पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. परंतू, कर्नाटक सरकारने आत्ता ५ लाख ३० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Last Updated : Aug 10, 2019, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details