सांगली- शाळेचे लोखंडी गेट अंगावर कोसळून अंगणवाडीत शिकणाऱ्या एका ५ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेदांत मनोज कारंडे असे चिमुरड्याचे नाव असून विटा नजीकच्या नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली आहे.
सांगलीत शाळेचे गेट अंगावर कोसळून ५ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू - सांगली बातमी
विटा नजीकच्या नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुट्टी दरम्यान वेदांत मनोज कारंडे हा अंगणवाडीतील चिमुरडा शाळेच्या मैदानात खेळत होता. यावेळी हातातील बॉल गेटच्या दिशेने गेल्यामुळे वेदांत हा बॉल आणण्यासाठी गेटकडे गेला. यावेळी शाळेचे भक्कम असणारे लोखंडी गेट वेदांतच्या अंगावर कोसळले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
हेही वाचा-बाप्पांसमोर अप्पर पोलीस अधीक्षकांचा फुगडीचा फेरा; तर उपअधीक्षकांचा पंजाबी तडका
विटा नजीकच्या नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुट्टी दरम्यान वेदांत मनोज कारंडे हा अंगणवाडीतील चिमुरडा शाळेच्या मैदानात खेळत होता. यावेळी हातातील बॉल गेटच्या दिशेने गेल्यामुळे वेदांत हा बॉल आणण्यासाठी गेटकडे गेला. यावेळी शाळेचे भक्कम असणारे लोखंडी गेट वेदांतच्या अंगावर कोसळले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. या घटनेची माहिती मिळताच शाळेत मिटिंगसाठी आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र निकम यांनी शिक्षकांच्या मदतीने तत्काळ जखमी वेदांला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या वेदांतचा वाटेतच मृत्यू झाला. १ वर्षांपूर्वीच उभारलेले लोखंडी गेट कोसळून ही घटना घडल्याने ग्रामस्थांच्या मधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर वेदांत याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.