सांगली - जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना क्वारेंटाईन ठेवण्यासाठी शासनाला जर गरज भासली तर चिकुर्डे येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याची तयारी असल्याचे शिवसेना नेते व माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांनी सांगितले. ही इमारत अभिजित पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. सध्या ती इमारत तयार असून स्टाफची नियुक्ती नसल्याने बंद अवस्थेत आहे.
CORONA : '..तर चिकुर्डे आरोग्य केंद्र होम क्वारेंटाईनसाठी वापरावे' - कोरोना
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने क्वारेंटाईनसाठी जागा अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना क्वारेंटाईन ठेवण्यासाठी शासनाला जर गरज भासली तर चिकुर्डे येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याची तयारी असल्याचे शिवसेना नेते व माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांनी सांगितले.
वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्य अशी बांधून तयार आहे. यामध्ये ५० खाटांची व्यवस्था असून सध्या शासनाकडून स्टाफची नियुक्ती नसल्याने बंद अवस्थेत आहे. तर इस्लामपूर व परिसरातील क्वारेंटाईन व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सांगली-मिरज येथील रुग्णालयात ठेवले जात आहे.
जर रुग्णांच्या संख्येत वाढ झालीच तर शासनाने चिकुर्डे येथील या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा उपयोग करावा. सध्या या इमारतीमध्ये स्वच्छता केली असून आज अभिजित पाटील यांनी संबंधित डॉक्टर व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर हे चिकुर्डे येथे येऊन पाहणी करणार असून, गरज पडली तर या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. तर रक्ताचा तुटवडा भासला तर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते रक्तदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.