महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापुराबाबत राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी दुरगामी विचार करून आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली दौरा

महापुराच्या बाबतीत प्रामुख्याने 6 जिल्ह्यात एक मोठा आराखडा दूरगामी विचार करून करण्यात येईल, ज्यामध्ये वडनेर समिती बरोबर तज्ञांशीही लवकरच चर्चा केली जाईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील महापुराच्या नुकसानीबाबत केंद्राकडे तीन मागण्या करण्यात आल्या असून एनडीआरएफचे निकष बदलण्याबरोबर बरोबर नुकसानग्रस्त विमा धारक व्यापाऱ्यांना 50% तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रमुख मागणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray

By

Published : Aug 2, 2021, 5:37 PM IST

Updated : Aug 2, 2021, 5:59 PM IST

सांगली -महापुराच्या बाबतीत प्रामुख्याने 6 जिल्ह्यात एक मोठा आराखडा दूरगामी विचार करून करण्यात येईल, ज्यामध्ये वडनेर समिती बरोबर तज्ञांशीही लवकरच चर्चा केली जाईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील महापुराच्या नुकसानीबाबत केंद्राकडे तीन मागण्या करण्यात आल्या असून एनडीआरएफचे निकष बदलण्याबरोबर बरोबर नुकसानग्रस्त विमा धारक व्यापाऱ्यांना 50% तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रमुख मागणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पूरस्थिती आणि मदतीचा आढावा -

सांगली जिल्ह्यातल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आणि सांगली शहरातील पूर बाधित भागाची पाहणी करत पूरग्रस्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता -
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की सांगली-कोल्हापूर-सातारा, कोकणातील चिपळूण सिंधुदुर्ग,रत्नागिरी या ठिकाणी महापूर आला. त्यामुळे मोठं नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये महापुराच्या बाबतीत कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत महत्वाचे आहे. पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे. दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचना देखील आल्या आहेत. तसेच वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल. तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज असून यातून पूर व्यवस्थापन, दरडी का कोसळतात, याचा शोध घेऊन अहवाल तयार केला जाईल. एक मोठा आराखडा तयार केला जाईल.
मदतीसाठी केंद्राकडे तीन मागण्या -
तर सध्याच्या महापुराच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एनडीआरएफचे निकष बदलणे त्याचबरोबर व्यवसायिक आहेत त्यांच्या विम्याचे 50 टक्के रक्कम तातडीने मदत म्हणून राज्य सरकारच्या महसूल प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या पंचांगानुसार ग्राह्य धरून देण्यात यावी. त्याचबरोबर नवीन कर्ज देताना कमी व्याज दराने देण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
मी धमक्यांना घाबरत नाही -
पुण्यातील व्यापार्‍यांनी वेळेच बंधन झुगारून दुकाने उघडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना, मी असल्या धमक्यांना घाबरत नाही, असा प्रति इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढ कमी होत नाही, तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Last Updated : Aug 2, 2021, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details