सांगली -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर परिस्थिती पाहणीसाठी सांगलीत गेले आहे. पण मुख्यमंत्र्यांना दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांच्या संतापाला सामोरे जावे लागले आहे. यावेळी संतप्त पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पूर पाहणी दौऱ्याबद्दल पूरग्रस्तांचा संताप पूरपरिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री सांगलीत मात्र पूरग्रस्तांनी व्यक्त केला संताप
महापूरा येऊन तब्बल पाच दिवस लोटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले आहेत. सांगलीतील हिराबाग चौक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लष्कराच्या जवानंकडून पूरस्थिती आणि बाहेर काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या बाबतचा आढावा घेतला. मात्र सांगलीवाडी येथील पूरग्रस्त नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या या उशिरा येऊन पूर पाहणी करण्याबाबत रोष व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत पूरग्रस्तांच्या भेटीला इतर नेते आणि नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्री याठिकाणी आले आणि गेले अशा संतप्त प्रतिक्रिया पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहेत. प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी करायला हवी होती, किमान पुराच्या पाण्यात एक पाऊल तरी ठेवायला हवे होते, असा संताप पूरग्रस्तांनी व्यक्त केला आहे.