सांगली - कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या जीवनाआवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून इतर सर्व वाहतूक बंद आहे. मात्र, दूध टँकर आणि भाजीपाल्याच्या गाडीतून छुप्या पद्धतीने काही लोक सांगली-कोल्हापूरमध्ये येवू नये यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवरील कणेगाव फाट्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुणे-बेंगळुरू महामार्गावर कणेगाव फाट्यावरील चेकपोस्टवर पोलिसांचा कडक पहारा - Kolhapur Police
कणेगाव ही सांगली-कोल्हापूरची हद्द असून येथून पुणे-बेंगळुरू महार्गावरुन जीवनावश्यक साहित्याची वाहतूक होत आहे. याठिकाणी कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी चेक पोस्ट तयार केले असून कुरळप पोलीस ठाणे व पलीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस कर्मचारी कडक पहारा देत आहेत.
कणेगाव ही सांगली-कोल्हापूरची हद्द असून येथून पुणे-बेंगळुरू महार्गावरुन जीवनावश्यक साहित्याची वाहतूक होत आहे. याठिकाणी कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी चेक पोस्ट तयार केले असून कुरळप पोलीस ठाणे व पलीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस कर्मचारी कडक पहारा देत आहेत. कोल्हापूर पोलिसांनी याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आरोग्य विभागाचे काही कर्मचारीही तीन शिप्टमध्ये येथे कार्यरत आहेत.
अतिआवश्यक परवाने पाहूनच वाहनांना सोडले जाते. यामुळे जिल्हाबंदीचा नियम चांगल्या पद्धतीने पाळत असल्याचे दिसून येत आहे. 20तारखेला महामार्ग थोड्या प्रमाणात शिथिल होणार असल्याने याचा फायदा घेऊन बाहेरून लोक ग्रामीण भागात येऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी या चेक पोस्टवर कडक नाकाबंदी केली असून सर्व गाड्यांची कसून तपासणी सुरू आहे.