महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ही' तर देवावर विश्वास नसलेली भूत, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका - सांगली भाजप बातमी

शिवसेनेसह दोन भूतं असल्यामुळे सेनेचाही देवावरुन विश्वास उडाला आहे. त्यामुळे ते मंदिर उघडण्यासाठी परवानगी देत नसल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

agitation
आंदोलनावेळचे छायाचित्र

By

Published : Aug 29, 2020, 5:12 PM IST

Updated : Aug 29, 2020, 5:59 PM IST

सांगली - महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे देवावर विश्वास नसलेली भूतं असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मंदिर सुरू करण्यासाठी आज (दि. 29 ऑगस्ट) मिरजेत भाजपाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले, त्यावेळी पाटील यांनी हे टीका केली आहे.

बोलताना आमदार चंद्रकांत पाटील
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापार, दुकाने, मंदिरे बंद केली होती. मात्र, आता या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन सर्व काही सुरू करण्यात येत आहे. दारू दुकान, व्यापार, उद्योगधंदे सर्व सुरू झाला आहे. मात्र, सरकारने अद्याप मंदिरे खुली केली नाहीत. त्यामुळे राज्यातील मंदिरे तातडीने खुली करावेत या मागणीसाठी भाजपकडून राज्य सरकार विरोधात राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते.

आज (शनिवार) सांगलीच्या मिरजेतही भाजपकडून आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील दत्त मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी उद्धवा दार उघड अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मंदिर न उघडण्याच्या निर्णयाबाबत घणाघाती टीका केली आहे. सरकारकडून आता दारुचे दुकान, रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात येत आहेत. मात्र, मंदिर उघडण्याबाबत सरकार निर्णय घेत नाही.

देशभरात सगळ्या ठिकाणी आता मंदिरात सुरू झालेली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकार मात्र मंदिर उघडण्यास तयार नाही. मुख्यमंत्र्यांचे आणि त्यांच्या वडिलांची आदी देवावर श्रद्धा होती. मात्र, त्यांनी आपल्यासोबत दोन भूत घेतली आणि त्या भूतांचा देवावर विश्वास नाही. त्यामुळे तुमचीही देवावर श्रद्धा राहिली नाही, अश्या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे .

हेही वाचा -कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Last Updated : Aug 29, 2020, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details