महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप आमदार हाळवणकरांची बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण - भाजप प्रदेश सरचिटणीस

भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत हाळवणकर यांची पाठराखण केली. आमदार हाळवणकर असे काही बोललेच नाहीत. भाजपच्या कार्डावर टोलनाक्यावर वाद घालू नका, असे हाळवणकर म्हणाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

By

Published : Jul 15, 2019, 10:10 PM IST

सांगली- बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचा फोटो असलेले भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जाता नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होता. यावर मोठा वादंग निर्माण झाला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र हाळवणकरयांची पाठराखण केली आहे.

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आमदार हाळवणकरांची पाठराखण
आमदार हाळवणकर असे काही बोललेच नाहीत. भाजपच्या कार्डावर टोलनाक्यावर वाद घालू नका, असे हाळवणकर म्हणाल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे. ते सांगलीत बोलत होते.भाजप कार्यकर्त्यांनी ओळखपत्र दाखवल्यावरही टोल नाक्यावरून फ्रीमध्ये सोडले जात नसल्याची तक्रार काही कार्यकर्त्यांनी केली होती. तर मिरजेच्या भाजप बुथ प्रमुखांच्या बैठकीदरम्यान भाजपचे प्रदेश सरचिटणीस इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली.

हाळवणकर म्हणाले होते, की हे ओळखपत्र चालत नाही. हे आपणाला माहिती आहे. तरीसुद्धा टोल नाक्यावरील कार्यकर्ते कार्ड बघितल्यावर त्या ओळखपत्रावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याने लफडे होऊ शकते. आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो. यामुळे आमदार, नेते आणि आणखी २-४ कार्यकर्ते गेले तरी काय अशा विचारातून सोडून देतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

सुरेश हाळवणकर यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला. यावर आज सांगली दौऱ्यावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार हाळवणकर असे काही बोललेच नाहीत. भाजपच्या कार्डावर टोलनाक्यावर वाद घालू नका, असे त्यांनी म्हटल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी हाळवणकर यांची पाठराखण केली.

ABOUT THE AUTHOR

...view details