महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चांदोली धरण 96 टक्के भरले; 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू - chandoli dam

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांमध्ये 230 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. धरण 96 टक्के भरले असून धरणातून 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

चांदोली

By

Published : Aug 4, 2019, 1:59 PM IST

Updated : Aug 4, 2019, 2:06 PM IST

सांगली- शिराळा तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून वारणा नदीला पूर आला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांमध्ये 230 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याने चांदोली धरण 96 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पूरस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चांदोली धरण 96 टक्के भरले

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चोवीस तासात तब्बल 230 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे धरण 96.51 टक्के भरले आहे. धरणातून गुरुवार पासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे चार वक्राकार दरवाजे सात फुटांनी उचलण्यात आले असून 20 हजार 427 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

शिराळा आणि वाळवा तालुक्यातील वारणा नदीवरील पाच बंधारे आणि तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. वारणा धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि संततधार पावसामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 2:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details