महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली - विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल - without-masks-and-weaving in sangli

कुरळप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातून चारदिवसात तब्बल शंभरच्या वर तक्रारी दाखल केल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरोनाच्या सुरवातीपासून प्रत्येक गावगावत पोलीस गाडी पाहून नागरिक पळ काढत होते.

विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By

Published : Jun 27, 2021, 12:48 PM IST

सांगली- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाळवा तालुक्यातील मास्क न घालता विनाकारण फिरणांऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याबाबतची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी ग्रामविकास अधिकारी व तलाठी अण्णासाहेबाना दिली आहे. त्यामुळोे लोकांना बाहेर पडल्यावर मास्क लावणे बंधनकरक आहे.

पोलिसांवरील ताण थोड्या प्रमाणात कमी

कुरळप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातून चारदिवसात तब्बल शंभरच्या वर तक्रारी दाखल केल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरोनाच्या सुरवातीपासून प्रत्येक गावगावत पोलीस गाडी पाहून नागरिक पळ काढत होते. यामुळे गावात पोलीस व नागरिकात पाठशिवणीचा खेळ सुरु होता. गाडी गेली की नागरिक पुन्हा रस्त्यावर येत होते. मात्र, आता तलाठी व ग्रामविकासाधिकारी यांना विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्याची परवानगी दिल्याने मोकाट फिरणाऱ्याची चांगलीच मुस्कटदाबी झाली आहे. यामुळे पोलिसांवरील ताण थोड्या प्रमाणात कमी होऊन आता गावाबरोबर तालुक्यातील वाढती रुग्ण संख्याही कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details