महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल - सांगली जिल्हा बातमी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 33 वर्षीय व्यक्ती विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इस्लामपूर पोलीस ठाणे
इस्लामपूर पोलीस ठाणे

By

Published : Jun 3, 2021, 10:27 PM IST

सांगली - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कलम 8 नुसार नंदकुमार भीमराव पाटील (वय 33 वर्षे, रा. तुजारपूर, ता. वाळवा) याच्या विरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार (दि. 2 जून) एक मुलगी गावातील किराणा दुकानातून चहा पावडर आणण्यासाठी गेली होती. दरम्यान, मुलगी घाबरून घरी परतली यावर आईने मुलीकडे चहा पावडर का आणली नाहीस, अशी विचारणा कली असता. मुलगी रडू लागली यावर आई व आजीने विश्वासात घेऊन विचारले असता दुकानात जाताना नंदकुमार पाटील याने घरी बोलावून विनयभंग केल्याचे सांगितले.

यावरुन पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी (दि. 3 जून) इस्लामपूर पोलिसात नंदकुमार पाटील याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

हेही वाचा -ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे 'येडं पेरलं, अन् खुळं उगवलं' - गोपीचंद पडळकर

ABOUT THE AUTHOR

...view details