सांगली- निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवार जोर लावत असतो. मात्र, नशीब साथ देईल असे नाही. पण, सांगलीच्या जत तालुक्यातील एका उमेदवाराला नशीबाची अशी काही साथ मिळाली की त्याने चक्क रस्त्यावरच जोर-बैठका काढल्या. तर समर्थकाने थेट कोलांट उड्या मारत आनंद व्यक्त केला आहे.
दोन्ही उमेदवारांना समान मते
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली. कोणी देव पाण्यात ठेवले तर कोणी मतदारांच्या पाया पडण्यापर्यंत सर्व हातखंडे वापरले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणवाडी याठिकाणी काँग्रेसच्या पॅनलकडून विश्वजित हिप्परकर हे निवडणूक रिंगणात होते. अत्यंत अटीतटीची त्यांची ही निवडणूक पार पडली आहे. सोमवारी (दि. 18 जाने.) मतमोजणी पार पडली आहे. या मतमोजणीत हिप्परकर यांना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला समान मते मिळाली आणि निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या समोर सुद्धा आता कोणाला विजयी करायचा हा प्रश्न पडला होता.