सांगली- वाळवा तालुक्यातील कुरळप येथे कुरळप आणि चिकुर्डे मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या 16 गावातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजने अंतर्गत पेन्शन मंजूर झालेल्या लोकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
यावेळी वाळव्याचे तहसीलदार यांच्या सुचनेनुसार टाळेबंदीच्या काळात वाहतूक बंद असल्याने गावाजवळील मंडळ कार्यालयामार्फत जागेवरच योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी कुरळप चिकुर्डे मंडळ अंतर्गत मेळावा घेण्यात आला. यावेळी 27 विधवा निराधार महिलांच्या व अपंग लोकांच्या कागदपत्रांची छाननी करून खतावनी करण्यात आली. पुढील पेन्शन अनुदानासाठी पाठवण्यात आली. या प्रकारच्या नियोजनामुळे लोकांचा वेळ, पैसे, त्रास वाचल्याने लोकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.