महाराष्ट्र

maharashtra

'कोरेगाव-भीमाप्रकरणी प्रकाश आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहेत'

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यावर भिडे आणि एकबोटे यांना वाचण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, आंबेडकर यांचा आरोप हास्यास्पद आहे. वास्तविक प्रकाश आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहेत. तसेच दंगल प्रकरणी संभाजी भिडे आणि एकबोटे जर दोषी आहेत तर आंबेडकर यांनी या दंगली प्रकरणी न्यायालयात आपली साक्ष देताना या दोघांचे नाव का घेतले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला

By

Published : Jan 25, 2020, 5:56 PM IST

Published : Jan 25, 2020, 5:56 PM IST

minister jayant patil
जयंत पाटील, जलसंपदामंत्री

सांगली -कोरगाव-भीमा दंगलप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचवत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच या दंगलीतील मुख्य सूत्रधारांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत राज्य सरकारने एसआयटी नेमून यासर्व प्रकारचा खुलासा करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते येथे बोलत होते.

जयंत पाटील, जलसंपदामंत्री

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यावर भिडे आणि एकबोटे यांना वाचण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, आंबेडकर यांचा आरोप हास्यास्पद आहे. वास्तविक प्रकाश आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहेत. तसेच दंगल प्रकरणी संभाजी भिडे आणि एकबोटे जर दोषी आहेत तर आंबेडकर यांनी या दंगली प्रकरणी न्यायालयात आपली साक्ष देताना या दोघांचे नाव का घेतले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यामुळे प्रकाश आंबेडकर हेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवत आहेत, त्याचा अर्थ होत असल्याचेही ते म्हणाले. आंबेडकर यांनी आधी या आपल्या साक्षीत या दोघांचे नाव का घेतले नाही, या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे आवाहनही केले.

हेही वाचा -'राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटतेय, रोज नवीन काहीतरी बाहेर काढताहेत'

या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, जे कोणी दंगल घडवणारे सूत्रधार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मग ते संभाजी भिडे, एकबोटे किंवा अन्य कोणी असो, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यावरून केंद्र सरकारने कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थाकडे (एनआयए) वर्ग केला आहे. मात्र, राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटी नेमून सर्व प्रकरणाचे चौकशी करून तो अहवाल जनतेसमोर मांडावा, अशी मागणी मंत्री पाटील यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details