महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक बस सेवा बंद - सांगली कोरोना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली एसटी आगाराने आंतरराजीय बस सेवा रद्द केली आहे. त्यामुळे कर्नाटकसह अन्य राज्यात जाणाऱ्या बस सेवा बंद झाली आहे.

st bus stopped
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक बस सेवा बंद

By

Published : Mar 20, 2020, 4:00 PM IST

Updated : Mar 20, 2020, 4:14 PM IST

सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कर्नाटक - महाराष्ट्र बस सेवा रद्द झाली आहे. सांगली आगारातून कर्नाटककडे जाणारी आणि शेजारच्या कर्नाटकमधून येणारी बस सेवा बंद झाल्या आहेत. कोरोनामुळे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक बस सेवा बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली एसटी आगाराने आंतरराजीय बस सेवा रद्द केली आहे. त्यामुळे कर्नाटकसह अन्य राज्यात जाणाऱ्या बस सेवा बंद झाली आहे. आधीच सांगली एसटी आगाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रवाशांनी पाठ फिरवल्याने सांगली आगारातून 500 हून अधिक एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. आज सकाळी काही सांगली आगाराच्या नियोजित बस कर्नाटक हद्दीत जाताना जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर आडवण्यात आल्या.

त्यामुळे आता कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेशकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर, दुसऱया बाजूला कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्रातील एसटी सेवा बंद केली आहे. सांगली जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणात एसटी फेऱ्या असतात, मात्र आता या बसेस कर्नाटक एसटी प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र - कर्नाटक राज्यातील बस सेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील परिस्थितीपर्यंत बंद झाली आहे.

Last Updated : Mar 20, 2020, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details