महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; तीन लाखांचे नुकसान

जत तालुक्यातील आसंगी तुर्क गावात एका पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या आगीत घरातील धान्य, सोन्याचे दागिने व गृहोपयोगी वस्तू असे सुमारे तीन लाखांचे सामान जळून खाक झाले.

gas cylinder explosion
गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक

By

Published : Nov 25, 2020, 10:25 PM IST

Updated : Nov 25, 2020, 10:47 PM IST

जत (सांगली) - गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ४ पोती ज्वारी, २ पोती गहू, १ पोती बाजरी, तीन तोळे सोने, शिलाई मशिन व शेती उपयोगी वस्तू खाक झाल्या आहेत. आगीत अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जत तालुका आसंगी तुर्क येथील भौरवा ईश्वर पुजारी यांच्या घरात आज सकाळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत घरगुती साहित्य व रोख रक्कम, धान्य व शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे अडीच ते तीन लाखापर्यंत नुकसान झाले आहे.

गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक
आसंगी तुर्कपासून एक किलोमीटर अतंरावर असलेल्या भौरवा ईश्वर पुजारी यांच्या शेतातील राहत्या पत्रा वजा छप्पराच्या घरात गॕसचा स्फोट होऊन आग लागल्यामुळे सर्व साहित्य, रोख रक्कम व धान्य जळाले. घटनास्थळी गाव कामगार तलाठी डी.वाय. काबंळे यांनी पंचनामा केला. या आगीत २ लाख ६१ हजारचे जळीत मध्ये नुकसान झाले आहे.
Last Updated : Nov 25, 2020, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details