सख्या भावाचा दगडाने ठेचून खून, रोजच्या त्रासाला कंटाळून भावाचे कृत्य - सख्ख्या भावाची हत्या
कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगाराचा सख्या भावाने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सांगली - कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगाराचा सख्या भावाने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सनी पारसमल जैन असे मृत या तरुणाचे नाव आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून भावाने हा खून केला आहे. या घटनेमुळे कुपवाड शहरात खळबळ उडाली आहे.
भावाला मारण्याच्या प्रयत्न गुन्हेगार भावाच्या जीवाशी -
कुपवाड शहरामधील सराईत गुन्हेगार सनी जैन याच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली आहे. सख्या भावाकडूनच हा खून झाल्याचं समोर आले आहे. कुपवाड शहरामधील राणा प्रताप चौकात शनिवारी रात्री आठच्या सुमारास सनी दारू पिऊन धिंगाणा घालत होता. यावेळी सनी याने सख्खा भाव असणाऱ्या शशांक जैन याला शिवीगाळ करत त्याला तलवार घेऊन मारण्याची प्रयत्न केला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी शशांक धावू लागला आणि सनी तलवार घेऊन शशांक याच्या मागे धावत सुटला. काही अंतरावर सनी हा खाली पडला असता शशांक याने क्षणाचाही विलंब न करता सनी याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये सनी हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.