सांगली- कृष्णा नदीच्या पुराचा फटका ग्रंथालयांनाही बसला आहे. पुराच्या वेळी शहरातील वाचनालये बुडाली होती. त्यामुळे तब्बल 60 हजार पुस्तके खराब झाली आहेत. तसेच तब्बल 150 वर्षांपूर्वीच्या पुस्तकांना जलसमाधी मिळाली आहे.
पुरामुळे 150 वर्षांपूर्वीची पुस्तके 'इतिहासजमा'; 60 हजार पुस्तकांना जलसमाधी - सांगली ग्रंथालय
कृष्णा नदीच्या पुराचा फटका ग्रंथालयांनाही बसला आहे. पूराच्या वेळी शहरातील वाचनालये बुडाली होती. त्यामुळे तब्बल 60 हजार पुस्तके खराब झाली आहेत. तसेच तब्बल 150 वर्षांपूर्वीच्या पुस्तकांनी जलसमाधी मिळाली आहे.
शहरातील राजवाडा चौक येथे असणाऱ्या सांगली नगरवाचनालयात पुराचे पाणी शिरले होते. आता पूर ओसरला असला तरीही ग्रंथालयातील सर्व पुस्तके इतिहास जमा झाली आहेत. गेल्या 150 वर्षांपासून या वाचनालयात पुस्तके जमा करण्यात येत आहेत.
सांगलीच्या नाट्यपंढरी, इतिहास, भूगोल, क्रीडा आणि विविध विषयांच्या कादंबऱ्या अशा जवळपास 60 हजारांहून अधिक पुस्तकांना पुराचा फटका बसला आहे. पुरातून वाचलेल्या पुस्तकांना वाचानालयाकडून सुकवण्यासाठी धडपड करण्यात येत आहे. मात्र या पुरामुळे सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाण्यात बुडाला आहे.