सांगली - सोयाबीन उगवन क्षमतेप्रकरणी सोयाबीन तज्ञ आणि कृषी अधिकार्यांची समिती गठीत करण्यात आली. या प्रकरणाबाबत तातडीने पाहणी करून अहवाल तयार केला जाईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिली. तसेच द्राक्ष आणि डाळिंब पिकांसाठी वर्षभर पीक विमा योजना लागू करण्याबाबत कृषी विभाग सकारात्मक असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज (मंगळवार) सांगली जिल्ह्यातील खरीप पिकांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला आमदार अनिल बाबर जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह कृषी विभाग आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यात झालेल्या खरीपाची पेरणी, पीक कर्ज, तसेच उपलब्ध खते व बियाणे यांचा आढावा घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात खते आणि बियाणांचा मुबलक साठा असल्याचे सांगितले.
सांगली येथे कृषीमंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद... हेही वाचा...हजारो हेक्टरवर पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; पंचनामे सुरू
यावर्षी राज्य सरकारकडून युरिय खताचा बफर स्टॉक करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना खते व बियाणे कमी पडू देणार नाही, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब व द्राक्ष यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आणि या शेतकऱ्यांच्यासाठी असणारी फळ पिक विमा योजनेच्या निकषात बदल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब फळ पिक विमा योजना वर्षभर लागू करण्याबाबत कृषी विभागाच्या विचार सुरू असून याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केला आहे.
त्याचबरोबर राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मार्ट योजना गेल्या वर्षी प्रस्तावित करण्यात आली आहे. शेतकरी, शेतकरी गट आणि शेती प्रक्रिया संस्था यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात या स्मार्ट योजनांना चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात फळबाग योजनेबाबत सध्या काही प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. प्रभाग योजना बंद होणार नाही, असा विश्वास मंत्री भोसले यांनी व्यक्त केला.
राज्यात नवीन कृषी दुकाने व परवाने नूतनीकरण बाबत निर्माण झालेला प्रश्न येत्या दोन दिवसात सोडण्यात येईल. तर राज्यात सध्या खरिपाच्या पेरणीमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नाहीत. त्यामुळे सोयाबीन उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्याने आपण प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. तसेच सोयाबीन उगवण क्षमतेच्या तपासणीबाबत कृषी अधिकारी आणि सोयाबीन तज्ञ यांची एक समिती गठित केली असून तातडीने या समितीला पाहणी करून अहवाल तयार करण्यात येईल. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
हेही वाचा...पेरलं पण उगवलंच नाही... नांदेडमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकरी हवालदिल